दसरा पालखी स्पेशल भटकंती :
कुडाळ, नरफदेव मेरुलिंग , वैराटगड, ब्रम्हेन्द्र स्वामी मंदिर (धावडशी)
मागील आठवड्यात उत्तराखंड मधील तीन केदार यात्रेनिमित्त सह्याद्रीतील रानफुलांचे स्पेशल ट्रेक करता आले नव्हते. ती कसर भरून काढायची म्हणून साताऱ्याजवळील मेढा परिसरात भटकंतीचे नियोजन झाले. तशी ही दरवर्षीची मँडेटरी ट्रिप पण यावेळेस कुडाळ मधील दसऱ्याच्या मुहूर्तावर निघणाऱ्या श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर देवांच्या पालख्या बघण्यासाठी खास मंडळी रविवारी सकाळी रवाना झाली. सकाळपासून आसमंतात जमू लागलेले ढग बघता मेरुलिंग वरून अफाट दृश्य दिसणार याची खात्री झाली. खंबाटकी घाट ओलांडला तसे वातावरण पूर्ण बदलले आणि निळ्याशार अवकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांची नक्षी विधात्याने चित्र रेखाटावे तसे भासू लागले.
डोंगर शिखरावरील नरफदेव मेरुलिंग मंदिर , त्यापल्याडचे धावडशी येथील पुरातन धाटणीचे ब्रम्हेन्द्र स्वामी मंदिर, कुडाळचे ग्रामदैवत श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर देवांच्या पालख्या, नरफदेव पठारावरची फुललेली रानफुले, निळ्याशार आसमंतात ढकलाढकली करणारे ढगांचे गुच्छ, मावळतीच्या रंगसंगतीत न्हाऊन निघालेला वैराटगड,वीरगळींचे गाव किकलीचे हेमांडपंथी धाटणीचे भैरवनाथ मंदिर असे सगळे नजारे पाहात दिवस समाप्त जाहला.
भटकंतीचा मार्ग :
पुणे - भुईंज फाटा - कुडाळ - वैराटगड - मेरुलिंग - मेढा रोड - धावडशी - मेढा रोड - हायवे - बारा मोटेची विहीर (शेरी लिंब ) - पाचवड फाटा - किकली - पुणे
असो , फोटोंची मजा घ्या!
 |
मेरुलिंग पठारावरून दिसणारा मनमोहक नजारा |
 |
श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर पालखी सोहोळा , कुडाळ |
 |
मेरुलिंग, नरफदेव |
 |
नभ मेघांनी आक्रमिले |
 |
श्री ब्रम्हेन्द्र स्वामी मंदिर, धावडशी |
 |
श्री ब्रम्हेन्द्र स्वामी मंदिर, धावडशी |
 |
श्री ब्रम्हेन्द्र स्वामी मंदिर, धावडशी |
 |
मेरुलिंग येथील एकमेव उजव्या सोंडेचा गणपती |
वाचत रहा !
सागर शिवदे