माझ्याविषयी



मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला,
सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला. 

याचा सोयीनुसार अर्थ असा की, विश्वात सौंदर्यपूर्ण, आश्चर्यजनक गोष्टी मी पाहिल्या. त्याची तोंडभरून स्तुतीही केली. पण शेवटी मी, माझे या पलीकडे न जाणारा मी, माझाच फोटो काढून आलो.
 
असो… 
रोजच्या रहाटगाडग्यातून, स्वतःसाठी काहीतरी करावे अश्या स्वार्थी विचाराने माझी दुर्गभ्रमंतीस सुरवात झाली....निसर्गातल्या गमती जमती, त्याच्या विविध छटा .. कुठे जाऊन काय बघायला मिळेल याची उत्सुकता ... दूरगामी गावात जिथे दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत असताना पाहुणचार करताना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे सुखी भाव...हरिश्चंद्रच्या कोकणकड्या वरून दिसणारे ...आणि स्वतःलाही विसरायला लावणारे विहंगम दृश्य.....साल्हेर, सालोटा ची उत्तुंगता ....ढाकोबाची चढण करताना कोकणात उतरणाऱ्या दाऱ्या घाटाचा इतिहास ...धोडप किल्ल्यावरील खिंड ....आणी मार्केंडेय पर्वतावरचे नवस पावण्यासाठी एकावर एक रचलेल्या, अन देवाला आंदण म्हणून दिलेल्या दगडांच्या राशी .... .मन वेडे होऊन जाते .....आणि मग त्याचे रूपांतर आवडीत झाल्यानंतर,आपली आवड आणि अनुभवलेली सुरेल निसर्गकविता इतरांपर्यंत पोहोचवण्याचा अट्टहास .. यातूनच जन्म झाला या ब्लॉग चा....
 रोजच्या चाकोरीच्या , संगणकासमोर बसून निष्फळ खर्डेघाशी करण्याच्या कामातून ( पोटासाठीच्या ) वेळ काढून काही लिहिण्याचा घाट घालणारा मी.
संगणक प्रणाली नोकरी बरोबरच, स्टेशनरी, कुरियरचा व्यवसाय चालवतो. वेळ मिळेल तशी स्वयंघोषित पदभ्रमण संस्था चालवतो. शनिवार-रविवार डोंगरावर भटकत असतो तर कधी सुट्टीच्या दिवशी पौरोहित्य करतो. उत्साहात कधी ज्योतिष मार्गदर्शन अभ्यास करतो. कधी प्रवास वर्णने लिहितो. कधी कॅमेऱ्यावर हात साफ करून घेतो आणि उरलेल्या वेळात लोकांना फुकटचे सल्ले देत फिरतो.

शेवटी काय तर ……………
असेच निर्मनुष्य मी ...जिथेतिथे असायचे...... मनात सूर्य वेचुनी... जनात मावळायचे!!!

माझा विरोप पत्ता: sagarshivade07@gmail.com
प्रोफेशनल माहिती ...
मी फेसबुकावर ..
ट्विटर वर फॉलो करा.












1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

Khupach chan bole lai bhari. ekach no..