गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

पाऊस सोहळा : १


 पाऊस सोहळा : १

वर्षातून कधीतरी मध्येच आठवण होते आणी समाधी अवस्थेत पोहोचलेल्या या ब्लॉगला संजीवनीचा प्याला प्राप्त होतो. पूर्वीसारख्या  डिटेल अन मोठ्याल्या पोस्ट लिहायचा पेशन्स आता मावळला असला तरी महिन्याकाठी भटकंतीची एखादी खरड टाकून वा फोटो डकवून परत यास निद्रित अवस्थेंत जाऊन द्यायचे नाही ठरवलंय. 

असो, यंद्याच्या पावसाळ्यात जरा काही फिरणे झाले त्याचे काही फोटो डकवत आहे. आवडतील अशी अपेक्षा आहे. मध्येच एखादी (ढापलेली ) साहित्यिक ओळ टाकून लेखाची साहित्यिक उंची वाढवायचा यत्न केलेला आहे. काय करणार? पाऊस म्हंटले कि आता साहित्यिक उधळण तर होणारच. पाऊस, मेघवर्षाव, पाचूचे हिरवे थर, घननीळा, हिरवाकंच शालू आणि तो घातलेली सृष्टी, इंद्रधनू, चिंब ओले रान, इ. गोष्टी तर आल्याच, म्हणजेच  पाऊस सुफळ झाला म्हणायचा.

रोजच्या जगण्यातल्या गोष्टी आणी जागा, त्याच पावसात न्हाऊन निघाल्या की कश्या नवथर वाटतात. ढगांनी गर्दी करून मावळतीला ढकला-ढकली सुरु केली कि आसमंत व्यापून जातो. याच ढगात डोके खुपसून बसलेल्या डोंगररांगा, सूर्यदेवाने 'निघतो आता' म्हणत आवरता घेतलेला पसारा, संधीप्रकाशाचा खेळ, मातीचा गंध, वाऱ्याच्या ओढीने वहावत जाणारे कापसासारखे ढग, ओल्याचिंब चिकणमातीत ताठ मानेने उभी भाताची रोपे, असंख्य जलधारा, अशी मनाला तजेला देणारी निसर्गाची किमया पाहिली कि मनोमन दाद देऊन ती डोळ्यात साठवणे एवढेच काय ते उरते.


असो फोटोंचा आस्वाद घ्या, आवडले तर अभिप्राय कळवा.

पाबे घाट :ओसरुनी सर गेली रे... उन्हे ढगातून आली रे. इंद्रधनुष्यामधून झळकती ,, हिरे माणके पाचू रे. 

मुळा गाव, मुळशी :


मुळा गाव, मुळशी :


नभ नको नको म्हणताना, पाऊस कशाने आला?  गात्रातून स्वछंदी अन अंतरात घुसमटलेला .. पाऊस असा रुणझुणता . 

निळकंठेश्वर :
चिंब भिजलेले .. रूप सजलेले : 

पानशेत :


वरसगाव :


घन ओथंबून झरती .. नदीस सागरभरती .... डोंगरलाटा वेढीत वाटा ..आसमंती ओझरती. 

किल्ले शिवनेरी, जुन्नर :दूर दूर नभपार ..डोंगराच्या माथ्यावर .. निळे निळे गार गार पावसाचे घरदार .. सरीवर सर !
जुन्नर :

किल्ले चंदेरी : किल्ले विसापूर :


 किल्ले अहिवंत :


किल्ले साल्हेर :

 
 वाचत राहा.

1 टिप्पणी:

kaka म्हणाले...

super ...........great photography