नभ मेघांनी आक्रमिले !!
मला लहानपणापासून माहीत नाही का पण आकाशाचे वेड लागलेले आहे. आजही सृष्टी निर्मात्याच्या निळ्याशार कागदावर पांढरे काळे ढग गर्दी करून आले तर आणी कधी केशरी झळाळी झाकोळली जात असताना दिसणारी विविधरंगी मुक्त उधळण बघायचे भाग्य लाभले की मी पुरता वाहवून जातो.
जितकी रूपे आजपर्यंत पाहिली ती सगळीच कायम मनात घर करून बसली. कधी भान हरपून बघत बसलो तर कधी भानावर आलो असेही म्हणता येईल.
कधी सह्याद्रीची आकाशात डोक खुपसून बसलेली शिखरे, तर कधी आकाशाची प्रतिबिंबे उमटलेली, कधी ढगांची नुसतीच चाललेली ढकलाढकली तर कधी सूर्यदेवाने 'निघतो आता!' म्हणत आवारत घेतलेला पसारा आणी जाता जाता काही राहिले तर नाही न खातरजमा करण्यासाठी ढगाआडून टाकलेला दृष्टीक्षेप. कधी आकाशाच्या निळाई ला टक्कर देत एकटाच उभा असलेला भगवा तर कधी या ढगांचे आणि आकाशाचे नक्की नाते काय आहे ते तपासण्यासाठी कापसासारख्या दुलई वरून केलेला प्रवास. सगळे काही फक्त मनात साठवून ठेवण्यासारखे.
घनगडावरून दिसणारा तैल-बैला
सह्याद्रीची आकाशात डोक खुपसून बसलेली शिखरे
कापसासारख्या दुलई वरून केलेला प्रवास
साल्हेर किल्ल्यावरून दिसणारे परशुराम मंदीर
तळटीप : शिर्षक, लिहिलेले, आणि फोटो याचा काही संबंध लागत नसल्यास आपण बरोबर आहोत असे समजावे. काहीतरी समर्पक शीर्षक देण्याच्या नादात उगाच काहीतरी खरडलेले आहे. :)
२ टिप्पण्या:
कधी ढगांची नुसतीच चाललेली ढकलाढकली तर कधी सूर्यदेवाने 'निघतो आता!' म्हणत आवारत घेतलेला पसारा आणी जाता जाता काही राहिले तर नाही न खातरजमा करण्यासाठी ढगाआडून टाकलेला दृष्टीक्षेप.
ह्या ओळी सुंदर आहेत. photography फारच सुंदर आहे
धन्यवाद सौरभ!
आपल्या सारख्या प्रतीक्रियांमुळे नवे लिहायला उत्साह वाटतो.
वाचत रहा :)
टिप्पणी पोस्ट करा