रविवार, २ नोव्हेंबर, २०१४

रायलिंग पठार, सिंगापूर नाळ, लिंगाणा.

रायलिंग पठार, सिंगापूर नाळ, लिंगाणा.
दिवाळीचा ( अगदीच वेळ जात नसल्याने) उपक्रम: सिंगापूर येथे फराळ वाटप......
सिंगापूर गावात फराळाच्या पिशव्या वाटल्या मुलांना. पण नंतर लगेच सटकलो कारण लाडू कडक झाले होते. थांबलो असतो तर .............  
मस्त दिवाळीचे दिवस होते. दिवाळीचा तिसरा पाडव्याचा दिवस होता. घरी संध्याकाळी कार्यक्रम असल्याने सकाळी सारसबागेत हिरवळ पाहायला जायचा प्लान ठरलेला होता. पण मागील वर्षाचा अनुभव पाहता सारसबागेतील हिरवळ बघण्याऐवजी रायलिंग पठारावरील हिरवळ जास्त खुणावत होती. म्हणून मग सकाळी सकाळी गाडी काढून एकटाच निघालो हिंडायला. 
रायलिंग पठार आणी तेथून समोर काळजात धडकी भरवणारा लिंगाण्याचे ते अभेद्य रुपडे याची देही याची डोळा पहायचे फार दिवस मनात होते. फोटो बघून तर केव्हा मुहूर्त लागतोय असेच वाटत होते. रायलिंग कडे जाताना लागणारे सिंगापूर नावाच्या गावाबद्दलही उत्सुकता लागली होती. एकदाचा काय तो निकाल लावावा म्हणून बाईक काढली अन सुटलो पाबे घाटाकडे. 
दिवाळीचे दिवस असल्याने घरी फराळ बनवलेला होताच म्हणून मग त्याच्या काही पिशव्या बनवून घेऊन निघालो. सिंगापूर गावात जेथे मी गाडी लावणार होतो तेथील मुलांना फराळ वाटायचा एकट्यानेच घेतलेला उपक्रम पार पडायचा होता. जायचे कसे वैगरे माहिती आधीच काढली होती. 
कोथरूड->खडकवासला-> सिंहगड -> सिंहगडाच्या मागून पाबे घाट-> वेल्हे (तोरणा) -> तोरण्याच्या मागून केळद रोडने भट्टी खिंड -> हरपुड फाटा -> सिंगापूर.
सकाळी सकाळी खडकवासला धरण.
पाबे घाटातून दिसणारा तोरणा किल्ला.
तोरण्याची बुधला माची मागील बाजू.
केळद रस्त्याने भट्टी खिंड ओलांडून पुढे आलो कि हा बोर्ड दिसतो. या बोर्ड पासून लगेच पहिला उजवीकडे कच्चा रस्ता जातो तो सिंगापूर ला जातो. दुचाकी आरामात जाऊ शकते. अर्थात टायर चांगले असतील तर. :)
सिंगापूर रोड वरून दिसणारा तोरणा बालेकिल्ला आणि बुधला माची.
लिंगाणा प्रथम दर्शन कुसारपेठ गावातून.
दूरवर फक्त आणी फक्त डोंगररांगा. आणि माणसाचा पत्ताच नाही कुठे. 
खिंडीपासून सुमारे १ तासात सिंगापूर गावात पोहोचलो.
सिंगापूर गावातील टुमदार घर : जेथे आजतागायत रस्ता आणी वीज दोन्हीही नव्हते. ८ किमी पायपीट करून चालत यावे लागायचे. नुकताच मातीचा कच्चा रस्ता बनला आहे तोच लोकांनी डोंगर फोडून प्लॉट पडायला सुरवात केलीये. मोहरी गावात अजूनही ३ डोंगर ओलांडूनच जावे लागते.






लिंगाणा आणी पाठीमागे दुर्ग दुर्गेश्वर रायगड किल्ला. शार्प कडा दिसतोय ते टकमक टोक.







लिंगाण्याला चढणे अशक्य तर लांबूनच चकलीची टोपी
.





या डोंगररांगांच्या कुशीतच मढेघाट, शेवत्या घाट , सिंगापूर नाळ लपलेले आहेत जे डायरेक्ट महाड तालुक्यात उतरतात.फोटोत नाव दिसतंय ती सिंगापूर नाळ असून ती लिंगणमाची नावाच्या गावात उतरते. तेथून लिंगाणा चढता येऊ शकतो. या पासून अजून पुढे बोराट्याची नाळ आहे जी दापोली गावात उतरते. तेथून रायगड जाता येते.


पूर्णतः निर्जन अश्या टापूत एकटाच हिंडत होतो म्हणून वाट चुकू नये यासाठी एका उपग्रहाला जोडीला घेतला. बाण दिसतोय तेथे गाडी लावली होती.





 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: