शनिवार, ९ जानेवारी, २०१६

सासवडचीये नगरी: लोणी भापकर

पूर्व लेख :

सासवडचीये नगरी : संगमेश्वर,चांगवटेश्वर

सासवडचीये नगरी: लोणी भापकर 

आता बारामती हायवेला लागलो. आणी सुसाट सुटलो.लोणी भापकरला वळण्याचा रस्ता चुकायला नको म्हणून MAP लावला आणी निघालो. येथून पुढे सुमारे २ वाजता पोहोचलो लोणी-भापकर.

लोकप्रभा मध्ये आलेला अभिजित बेल्हेकर यांचा लेख वाचूनच लोणी भापकर ला जायचे नक्की केले होते. मोरगाव-बारामती रोड वरून एकदाचा "लोणी भापकर" फाटा दिसला आणी हुश्श केले. सुर्य डोक्यावर आलेला आणी पोटातही डोंब उसळलेला. फाट्यापासून सुमारे १५-२० मिनिटे गाडी हाकत गेल्यावर गावात पोहोचल्याचे सुतोवाच झाले. जरा वर्दळ दिसू लागली आणी त्यातच एका मंदिराचा कळस अगदी दूरवरूनही लक्ष वेधून घेत होता. तेच हे काळभैरवनाथ मंदिर. 

काळभैरवनाथ मंदिर:-

हे मंदिरही पुर्वाचीन असले पाहिजे असे आतमधील कातळकला बघून लक्षात येते. सद्यकाळात त्यावर रंगरंगोटी करून त्याचे नूतनीकरण (??) करायचा यत्न केला गेलाय.

गाडी मंदिराच्या बाहेर लाऊन आमचा फापट-पसारा बाहेरच ठेऊन मंदिरात जाऊन बसलो. रखरखत्या उन्हातून एकदम दगडी मंदिरात गेल्यावर कमालीचा गारवा जाणवला. मंदिरात महिला पुजारी होत्या. भैरवनाथाला महिला पुजारी कश्या असे एकक्षण वाटले पण मी त्या गणिताचा उलगडा करायला आलो नव्हतो. नमस्कार करून, गुलाल उडवून, थोडा आजूबाजूला फेरफटका मारला.
काळभैरवनाथ: 
मंदिराच्या बाहेर दोन मोठ्या दगडी दिपमाळा आहेत . त्याने मंदिराचे रूप अजून खुलून दिसले. शेजारीच एक विहीर आहे. गाडी चिंचेच्या सावलीत दम खात होती म्हणून थोडा वेळ टीपी केल्यावर मंदिराच्या मागे गेलो.तेथे काही विरगळ होत्या. त्या बघून थोडे पुढे गेलो तर गावातल्या मुलांचा मस्त गोट्यांचा डाव जमला होता.
एकाला सांगितले की तू लांबून उडव यातली एक गोटी आणी मी फोटो काढतो. मला वाटले खूप वेळ जाईल आणि बरेच फोटो काढावे लागतील. पण हा बघा पहिलाच शॉट. ताडी !!!
एकाच गोटी उडवून स्ट्रायकर गोटी कोणालाही धक्का न लावता बाहेर निघून गेली. वा वा sss 

भंकस झाली, गाडीही शांत झाली होती. मग निघालो मल्लिकार्जुन मंदिराकडे.
अडीच च्या सुमारास येथे पोहोचलो. पूर्ण निर्जन असे स्थान माझ्या जोडीला मंदिरातील देव आणी काही श्वान लोक्स. येथे आल्यावर मात्र "आधी पोटोबा नंतर विठोबा" म्हणत डबे उघडले.
कडकडून लागलेली भूक डबा उघडताच गोड शिरा पाहून अजून वाढली. आणले होते नव्हते ते सगळे मांडून खायला सुरवात करताच अजून २ श्वानांची कंपनी लाभली.
मल्लिकार्जुन मंदिर :
सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि नागर शैलीतील विटांचे शिखर अशी या उत्तराभिमुख मंदिराची रचना. यातील सभामंडप पूर्वीच पडल्याने आपण थेट गाभाऱ्यापुढील विस्तीर्ण अंतराळात प्रवेश करतो. पण तत्पूर्वी प्रवेशद्वारावरील रत्न, रूप आणि स्तंभ शाखा आणि त्यातील निसर्ग रूपकांवर नजर टाकायची आणि तळातील द्वारपालांची परवानगी घेत आत शिरायचे. - See more at: http://www.loksatta.com/trekit-news/loni-bhapkar-temple-in-baramati-1044948/#sthash.JTREhOTl.dpuf
सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि नागर शैलीतील विटांचे शिखर अशी या उत्तराभिमुख मंदिराची रचना. यातील सभामंडप पूर्वीच पडल्याने आपण थेट गाभाऱ्यापुढील विस्तीर्ण अंतराळात प्रवेश करतो. पण तत्पूर्वी प्रवेशद्वारावरील रत्न, रूप आणि स्तंभ शाखा आणि त्यातील निसर्ग रूपकांवर नजर टाकायची आणि तळातील द्वारपालांची परवानगी घेत आत शिरायचे. - See more at: http://www.loksatta.com/trekit-news/loni-bhapkar-temple-in-baramati-1044948/#sthash.JTREhOTl.dpuf
सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि नागर शैलीतील विटांचे शिखर अशी या उत्तराभिमुख मंदिराची रचना. तळातील द्वारपालांची परवानगी घेत आत शिरताच, आता सभामंडप नसला कारणाने आपण मंदिरात प्रवेश करताच गाभाऱ्या पुढच्या जागेत येउन पोहोचतो. आता पुरेसा प्रकाश नसूनही फक्त आजूबाजूला बघण्यात आपण गर्क होऊन जातो. प्रत्येक भारवाहक खांबांवर केलेले मनसोक्त कोरीवकाम आणि त्यां शिल्पांचे संदर्भ समजावून घेता घेता आपण मध्ययुगीन इतिहासात हरवून जातो.


ठिकठिकाणी कोरलेल्या कृष्ण-मुद्रा, कृष्ण-लिला, भारवाहक यक्षिणी व इतर अनेक अबोध अशी शिल्पे.

शिवाच्या पायाशी डोक टेकवून आपण बाहेर पडतो तोच समोर दिसते विस्तीर्ण अशी पुष्करणी.

 पुष्करणीत पाणी नसल्याने आपोआप समोर लक्ष गेले ते म्हणजे कोरीवकलेच्या उत्कृष्ठ आविष्काराकडे. दगडी नंदी-मंडप.
मंडपाच्या चारही बाजूने उत्कृष्ठ असे कोरीवकाम केलेले आहे. पौराणिक शिल्पे, कामशिल्पे आणी अनेक गज-शिल्पे.

या मंडपात पूर्वी यज्ञवराह विराजमान होता असे तेथे नव्याने उपस्थित झालेल्या आजोबांनी सांगितले. आजोबा न विचारता मला माहिती पुरवत होते त्यावरूनच त्यांचा उद्देश्य माझ्या लक्षात आला. थोडी श्रवण-भक्ती करून मग फोटोभक्ती चालू केली.
येथे एक मांजर होती ती सारखी माझ्या मागे मागे येउन पायात येत होती. तिच्या पेकाटात लाथ घालून हाकलून द्यावी वाटत होत. पुल म्हणतात तसे मांजर हा जगातला सर्वश्रेष्ठ उच्छाद आहे.

यज्ञवराह पाहिला आणी वाटले ..... वाह ss याच साठी केला होता अट्टाहास. !!  

आधी वाचलेल्या लेखांमध्ये हे शिल्प मंदिराच्या मागे झाडीत पडलेले आहे असे वाचले होते. पण त्या लेखांचा इफेक्ट कि काय म्हणून हे शिल्प मंदिराच्या सुरवातीलाच मोकळ्या भागात आणून ठेवले आहे.  
मी निघतोय असे वाटून आजोबा पुन्हा प्रकटले. 
हे शिल्प त्या पुष्करणीच्या नंदी मंडपात स्थानापन्न होते.त्यानंतर औरंगजेबाच्या आक्रमणात आणी युद्धात ज्या काही मंदिरांची आणी शिल्पांची भंजने झाली त्यात याचाही नंबर लागतो. भुलेश्वर येथील भंजलेल्या मूर्तींची आठवण झाली.  

"त्या मुसलमानांनी ह्या मूर्तीचे त्वांड फोडून फ्याकून दिलेली झाडीत. इतक्या दिवस तिथेच पडून होती. गावातील लोकांनी आणलीये इथे काही दिवसांपूर्वी. ते उचलतय थोडी कोणाला? दोरी बांधून आणायला लागल तर हलेना जागच. क्रेन बोलावली मंग आणी क्रेनने उचलून आणून ठीवलाय इथे!"- इति आजोबा.
"त्या काळचे ते मुसलमान म्हणजे" अश्या हरीतात्यांच्या आवेशात जात असतानाच यज्ञ वराहाच्या देखणेपणाने मला इहलोकी आणले.
अडीच फुट उंचीच्या या वराहाच्या शिल्पाचे तोंड फोडलेले आहे पण त्याच्या पाठीवरील असंख्य विष्णुमूर्ती कोरलेल्या पाहून कारागिराच्या नाजूक हाताची कल्पना येते. पाठीवर छोटय़ा-छोटय़ा तब्बल १४२ विष्णू मूर्तीची झूल चढवलेली आहे. 
या वराहाच्या पायाशी शेष कोरलेला आहे. तर चार पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची प्रतीके साकारलेली आहेत. पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले आहेत आणि मुख्य म्हणजे पाठीवर छोटय़ा-छोटय़ा तब्बल १४२ विष्णू मूर्तीची झूल चढवलेली आहे. - See more at: http://www.loksatta.com/trekit-news/loni-bhapkar-temple-in-baramati-1044948/#sthash.JTREhOTl.dpuf

या वराहाच्या पायाशी शेष कोरलेला आहे. तर चार पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची प्रतीके साकारलेली आहेत. पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले आहे.
पायाखाली दबलेली गदा आणि दोन पायांमध्ये हात जोडून असलेले मानवी मुख असलेली शेष-रुपी शिल्प , वाराहाने शेषावर मिळवलेल्या अधिपत्त्याची जाणीव करून देतो.

वराहाच्या शेपटीत पृथ्वी गुंढाळलेली आहे असे एका लेखात वाचलेले होते.
बरेच फोटोसेशन झाले. नाऊ टाईम टू गो होम !!

मी निघत असलेले बघताच सावलीत झोपलेले आजोबा पुन्हा प्रकटले आणी त्यांनी "काही" मदत करा म्हणताच माहितीचे प्रयोजन कळले. त्यांना यथाशक्ती मदत करून, तेथीलच एका मोठ्ठ्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा पाडून घेतल्या भाच्चीसाठी.

आता गाडीला टांग मारून परतीच्या मार्गाला लागलो. येताना दिवे घाटातून जावे का असा विचार करता लगेच सोनोरीचा किल्ला/ मल्हारगड आठवला. वेळही हातात होता. आणी किल्लाही छोटेखानी होता.

सासवडची फ़ेमस अंजिरे येताना लक्ष वेधून घेत होती. थोडी घासाघीस करून १ किलो अंजिरे घेतली. पुढे ट्रेक करायचा आहे हा विचारच नव्हता. घरी येउपर्यंत त्यांचे पानिपत झालेच होते. असो. दिवे घाटाच्या अलीकडे एका टपरीवर सोनोरी विचारले आणि फाट्यावरून उजवीकडे गाडी वळवली.

आता एका छोट्या आणी उजाड अश्या रोडवर मी एकटाच चाललो होतो. मागे, पुढे, समोर कुठेही चीटपाखरूही दिसेना. तसचं संभ्रमित पुढे गेलो मग एक मामांना लिफ्ट दिली त्यांनी रस्ता समजावत भर गावात आणून सोडले. तेथून निघालो मल्हारगडचा बेस. त्याबद्दल पुढील भागात .

सासवडचीये नगरी: मल्हारगड/सोनोरीचा किल्ला, पानसे-वाडा

वाचत राहा. 

सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि नागर शैलीतील विटांचे शिखर अशी या उत्तराभिमुख मंदिराची रचना. यातील सभामंडप पूर्वीच पडल्याने आपण थेट गाभाऱ्यापुढील विस्तीर्ण अंतराळात प्रवेश करतो. पण तत्पूर्वी प्रवेशद्वारावरील रत्न, रूप आणि स्तंभ शाखा आणि त्यातील निसर्ग रूपकांवर नजर टाकायची आणि तळातील द्वारपालांची परवानगी घेत आत शिरायचे. - See more at: http://www.loksatta.com/trekit-news/loni-bhapkar-temple-in-baramati-1044948/#sthash.JTREhOTl.dpuf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: