पक्षी जाय दिगंतरा
मुळात पक्षी हे उच्छाद आहेत का ते पाळणारे खरे उच्छाद आहेत? या पुलं च्या प्रश्नाचे उत्तर अजूनतरी मला सापडल्याने कोणताही पक्षी पाळण्याचे धाडस केले गेलेले नाही. ( उपमा चुकली आहे पण कोण्या मोठ्या लेखकाचे नाव कोणत्याही संदर्भहीन वाक्यात घुसडून लेखाची सुरवात केली गेली तर उगाचच काहीतरी भारी लिहितोय असे फिलिंग येते म्हणून.) असो.
ग्रेट पाइड होर्नबिल पक्षी पहिल्यापासून मला पक्ष्यांविषयी जरा कुतूहल निर्माण झाले आहे. पक्षी निरीक्षण आणी त्यांची ओळख या विषयात मी अगदी बाळबोध ( मॉडर्न वाचकांनी 'ज्युनिअर केजी' वाचावे)) असलो तरी काहीच्या काही फोटो काढून सुरवात झाली हे ही नसे थोडके!
ग्रेट पाइड होर्नबिल/ धनेश :
गोल्डन ईगल :
किंगफ़िशर: White throtted kingfisher