टुकार मीशिभोबोची प्रभातवारी
या
लोकशाही उत्पत ( उद्धट हि चालेल) देशात पोटासाठी कोण काय करेल सांगता
येणे 'लै म्हणजे लैच' अवघड आहे. कोण पोटासाठी काकडीच्या साली काढून काकडी
बरोबर सालीही विकत, तर कोण त्या काकडीच्या सालापेक्षाही फालतू सिनेमे काढून
लोकांच्या भावनेचे भांडवल करून स्वतःचे पोट भरत.
येथे
आता या दुसऱ्या टुकारगिरी विषयी लाक्षणिक विवेचन होणार आहे. कोणाला पटेल न
पटेल. पण "कुत्ता जाने, चमडा जाने" अश्या ( उदात्त!) हेतूने लिहायचा
प्रयत्न आहे.
असो,
तर घडले असे की, बऱ्याचं दिवसात 'चांगला' सिनेमा पहिला नाही असा सगळ्यांचा
सूर निघाला. मग लोकांची मते घेऊन कुठल्यातरी सिनेमाला जाऊ असे ठरले.
मग
कुठून माहीत नाही पण 'एक' नाव कळले. हा सिनेमा म्हणे तुफान चालला होता.
थेटरच्या बाहेरून 'तुफान चाललाय' असे काही वाटले नाही. पण वाटले की आत
पहिल्यांदा पिच्चर मधली माणसे एकमेकांना बेफाम बदडून काढत असावीत आणि नंतर
तिकीट काढून अश्या टुकार पिच्चरला तुझ्यामुळे आलो म्हणून प्रेक्षक
एकमेकांना बदडून काढत असावीत.
मी स्वतःच्या जबाबदारी वर आत गेलो आणि मित्राकडून बदडून घ्यायचाच बाकी राहिलो.
पिच्चर
तर ठरला पण आता जायचे कुठल्या थेटरात? एक म्हणाला कोथरूड सिटीप्राईड ला
जाऊ. पण म्हटले 'मीशिभोबो' बघण्यासाठी फारतर २० किंवा अगदी डोक्यावरून
पाणी म्हणजे ३० रुपडे ठीक आहेत. दीडशे रुपडे घालवायच्या लायकीचा पिच्चर
तरी असतो का त्या 'मांजरीचा' ?
मग त्या दिवशी आमची उभ्या वीस वर्षात न झालेली 'प्रभात' वारी घडली.
एक
मित्र पहिल्यापासूनच नाखूष होता. "कुठेही आणता मला तुम्ही" असेच भाव
त्याच्या चेहऱ्यावर होते. आख्खे ३० रुपडे मोजून तो पहिल्यांदाच अश्या मराठी
पिच्चर ला आला होता.
जसा
पिच्चर सुरू झाला तसा एक टकला हीरो आला आणि मग जो येईल तो या टकल्याला
घालून पाडून बोलू लागला. काही काळाने तो टकला वेडा झाला. नंतर एका IT पार्क
मध्ये डांबरी रस्त्याने घोडे धावताना दिसले. काही काळ असाच फालतूपणा झाला
आणि मग शेवटाला तो टकला पेटला आणि मग त्याने सगळ्यांना हाणला आणि "मला
रिस्पेक्ट द्या" म्हणाला". असे अगम्य काही तरी होते. ( या सगळ्यामागचा
दाखवायचा, समजवायचा आणि खरा मूळ मुद्दा वेगळाच होता. )
त्यातला
'दाखवायचा' जो हेतू होता त्याने चित्रपट गृहातील माणसे चार्ज झाली होती.
सगळ्यांना स्वभाषा, स्वधर्म अशी गोष्टीचा ताप आला होता. मिनटा मिनिटाला
मराठीच्या महानतेचा घाम फुटत होता. पण त्यातून 'समजण्याचा' व बोध घेण्याचा
मुद्दा लक्षात घेण्याच्या परिस्थितीत कोणीही नव्हते.
तो
टकला तेथे पेटला होता तर, माझ्या शेजारी माझा हा मित्र पण पेटला होता, पण
दुसऱ्या मुद्द्यावर. तो मिनटा मिनटाला फ्रस्टेट होत होता. वास्तविक हा आमचा
मित्र उत्तम कविता करतो, उत्तम वाद्ये वाजवतो, स्टेज शो हि
करतो.जाहिरातींना आवाज देतो. आणि हे सगळे मराठीतच. त्यामुळे त्याचे
मराठीवरचे प्रभुत्व वादातीत आहे. पण त्याला जो काही समोर भाषेचा बाजार
मांडला होता तो बघवत नव्हता. बराच वेळ तो आमच्यातच कमेंट देत होता.
शेवटी
एका प्रसंगात, सामान्य मराठी माणूस म्हणवणाऱ्या माणसाची मुलगी कॉलेजाच्या
ग्यादरिंग मध्ये लावणी का आयटम सॉंग ( का सोंग) करायला लागली.
हा मध्येच उठून उभा राहिला आणि आम्हाला जोरजोरात ओरडायला लागला.
ती तिथे पेटली होती आणि हा इथे.
"
कसल्या भंगार पिच्चर ला आणता रे मला तुम्ही?? आत्ताच्या आता माझे तीस
रुपये परत द्या. फुकट तीस रुपये घालवले माझे वाया. त्यापेक्षा मी ते
भिकाऱ्याला दिले असते. "
आम्ही ओढून त्याला खाली बसवला. त्याला म्हटले "शांत बस बाबा, लोकांना इथे मराठीचे स्फुरण चढलेय, हाणतील तुला इथेच!"
तो नाईलाजाने बसला.
नंतर पुढच्या प्रसंगात तीच नाचणारी मुलगी घरी कॉम्पुटरवर पडल्या पडल्या, एका कॉलेज ची वेबसाइट ह्यॅक करते म्हणे.
आता मला खरी मजा यायला लागली. माझा हाच मित्र 'एथिकल ह्यॅकींग' शिकला असल्याने तो हे पाहून संपलाच. तो ताडकन उभा राहिला.
"च्यायला
बापाची वेबसाइट आहे का घरबसल्या ह्याक करायला? काहीही दाखवतात का हे साले?
अरे वेबसाइट ह्याक करायला इंटरनेट लागते का नाही हे तरी माहीत आहे का
ह्यांना? सिम्पली रीडीक्युलस "
त्यानंतर तो पाच सहा टेक्निकल शब्द टाकून 'ह्याने हे होते का?" त्याला हे लागते का?" लोक बघतात म्हणून काहीही दाखवतात का हे लोक?" असे किंचाळू लागला. ते टेक्निकल शब्द ऐकून त्याच्या शेजारच्या माणसाने हातातल्या पुरचुंडी मधले सगळे पोपकोर्न पोटात ढकलले. (स्वतःच्या !)
तो थेटराबाहेर निघून गेला. आम्ही पिच्चर संपवून बाहेर गेलो तर गाडीवर बसला होता.
हा पिच्चर "टकल्याची अॅक्शन-पब्लिकला घाम" म्हणूनही खपला नसता हो !
यातला 'पब्लिकला घाम' हे ठीक (कारण तो आलाच होता) पण तो टकला 'अॅक्शन' पण नव्हता करत हो
थोडा वेळ (डायरेक्टर ने सांगितल्यामुळे) लाचार झाला, मग वेडा झाला, मग भक्त झाला, मग भाई झाला आणि मग राजकारणी झाला.आणि उरलेल्या वेळेत भिकार डायलॉग मारत बसला. बाकी सर्व प्रसंगात डायरेक्टर स्वतःच ( रात्रीची जरा जास्त(च) झाल्यासारखे डोळे करून आणि शेरवानी घालून) (घोड्या)समोरच हंटर घेऊन बसला होता.

"तुम्ही सगळे मिळून माझे तीस रुपये परत द्या, नाहीतर जाऊ देणार नाही" असे म्हणत त्याने आमच्या गाड्याच पकडून ठेवल्या होत्या.
हा पिच्चर "टकल्याची अॅक्शन-पब्लिकला घाम" म्हणूनही खपला नसता हो !
यातला 'पब्लिकला घाम' हे ठीक (कारण तो आलाच होता) पण तो टकला 'अॅक्शन' पण नव्हता करत हो
थोडा वेळ (डायरेक्टर ने सांगितल्यामुळे) लाचार झाला, मग वेडा झाला, मग भक्त झाला, मग भाई झाला आणि मग राजकारणी झाला.आणि उरलेल्या वेळेत भिकार डायलॉग मारत बसला. बाकी सर्व प्रसंगात डायरेक्टर स्वतःच ( रात्रीची जरा जास्त(च) झाल्यासारखे डोळे करून आणि शेरवानी घालून) (घोड्या)समोरच हंटर घेऊन बसला होता.
तो
मी बघितलेला शेवटचा मराठी पिच्चर असावा .परत कधी ह्या मित्राच्या शिव्या
ऐकायची हुक्की आली की त्याच पिच्चरच्या दिग्दर्शक म्हणविणाऱ्या माणसाचे इतर
पिच्चर पाहायची ऑफर आम्ही त्याला देतो. आणि मग भगीरथाने गंगा आणावी तसे हजारो ऐकिवात नसलेले
मराठीतील अवजड असे (अप)शब्द वायू वेगाने एका नंतर लगेच एक असे ऐकायला
मिळतात.
खरंच, मराठी भाषा ही शब्दसंपन्न भाषा आहे. हे तेव्हा आम्हाला स्मरते. 
(तळ)टीप :
१. चांगला' सिनेमा : हि व्याख्या व्यक्तीसापेक्ष होऊ शकते.
२. लेखन (वाचणाऱ्याला वाटले नाही तरी(ही)) विनोदी प्रकारातील आहे. येथे कोणत्याही चर्चा, अपमान व अभिमान अपेक्षित नाही.
३. टीप वरती का नाही लिहिली हे विचारू नये. उत्तर मिळणार नाही. ( कारण, याचे उत्तर लेखकाकडे(ही) नाही)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा