पाऊस सोहळा : २
पहिला भाग येथे वाचता येईल. : पाऊस सोहळा : १
लांबच लांब पसरलेले हिरवेगार गालिचे. त्यावर नैसर्गिक मुक्त उधळण. ढगातले पाण्याचे थेंब अंगा-अंगावर थबकून अगदी पापण्यांवरही जमा झालेले दवबिंदू. गर्द जंगल आणी दाट धुके यामुळे झालेला मस्त माहोल, मोकळ्या आकाशाखालची मुक्त भटकंती. मावळतीला ढगांनी गर्दी करून व्यापलेला आसमंत. तांबडफुटीला ढगात डोके खुपसून बसलेल्या डोंगररांगा, सूर्यदेवाने 'निघतो आता' म्हणत आवरता घेतलेला पसारा, संधीप्रकाशाचा खेळ, मातीचा गंध, वाऱ्याच्या ओढीने वहावत जाणारे कापसासारखे ढग, ओल्याचिंब चिकणमातीत ताठ मानेने उभी भाताची रोपे, असंख्य जलधारा. सगळे काही पाहतच राहावे असे.
या सोहोळ्याचे आपण साक्षीदार आहोंत हेच काय ते भाग्य. निसर्गाची किमया टिपण्याचे काही प्रयत्न. वाचत रहा.
साल्हेर किल्ल्यावरून दिसलेले इंद्रवज्र.:
सकाळची वेळ, महाराष्टातील सर्वात उंच, अजस्त्र पण हिरवागार साल्हेर किल्ला, कुठे पृथ्वी संपते आणि स्वर्ग चालू होतो याची चाहूलही लागू न देणारे उंच डोंगर आणि त्यावर उतरलेले ढग, पावसाळी वातावरण, हिरवा ब्लेझर घालून सजलेली सृष्टी, पूर्ण किल्ल्यावर फक्त दोनच भटके, पूर्णतः धुके, कोवळी सूर्यकिरणे, हलका पाऊस, डोळे आणि मन भरून पाहावे असे दृश्य, इतिहासाची साक्ष देत उभे साल्हेरचे सहा बुलंदी दरवाजे, थोडेसे धुके बाजूला काय होते आणि कोवळ्या सुर्यकिरणांनी अशी काही जादू दाखवावी की डोळे आणि कॅमेरे स्तब्ध होऊन जावेत. 'काय होते आहे' हे समजण्याआधीच त्याचे लुप्त होणे आणि क्षणात परत अवतरणे. निरव शांतता भंग करत आम्हा दोघांचे एकच शब्द. "इंद्रवज्र सुपर्ब". उंच अश्या कड्यावरून खाली दरीत दिसणारे सप्तरंगी सुदर्शन चक्रच जणू. आणी त्या सुदर्शनात पडलेली माझीच सावली. अहाहा ! हा निसर्ग सोहळा अनुभवायचे भाग्य आज लाभले.
अंजनेरी किल्ला : हा फुलाचा फोटो पाहून 'अवतार' पिक्चर आठवला. 'Self Illuminating Trees' सदृश्य काहीतरी वाटत आहे.
अंजनेरी किल्ला :
सालोटा किल्ला:
धोडप किल्ला :
पुरंदर किल्ला :
धोडप किल्ला : Way to Heaven. ( मुद्दाम साहेबाच्या भाषेत लिहिले, नाहीतर स्वर्गात जाणारा रस्ता म्हणजे गैरसमज नको !)
अहिवंत किल्ला :
कण्हेरगड :
मुळा गाव :
कण्हेरवाडी :
कण्हेरगड :
रामशेज किल्ला :
साल्हेरवाडी गावातून :
असो, सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलो यापलीकडे भाग्य ते कोणते?
वाचत रहा. अभिप्राय कळवत रहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा