पूर्व लेख :
२०१३! फुल टू कमाई !
२०१४! काठावर पास !
२०१५! सॉलीट्युड ते दोनाचे चार !
२०१६! जुना गडी , राज्य नवे !
२०१८! बॅक टू ट्रॅक !
२०१९! पायाला भिंगरी !२०१४! काठावर पास !
२०१५! सॉलीट्युड ते दोनाचे चार !
२०१६! जुना गडी , राज्य नवे !
२०१८! बॅक टू ट्रॅक !
आठ तासांच्या विश्रांतीचे थांबे घेत धावता धावता अजून एक पूर्ण वर्ष संपले. अनुभवांच्या पाठपिशवीत बऱ्यापैकी भर पडली असं वाटतय. काही नवीन प्रसंग,आठवणी,काही लाईफ गोल्स व बरच काही.
प्रत्येक महिन्याकाठी कुठेतरी, अगदी जवळपास का होईना पण भटकून आला पाहिजे असा शिरस्ता, आज मागे वळून बघता बऱ्यापैकी साध्य होतोय . वर्षभरात जिथे जिथे जाऊन आलो त्याची फोटोरूपी झलक देण्याचा अजून एक प्रयत्न करतो आहे. पुढे कधीतरी मागचे भटकंती कॅलेंडर पाहून माझे मलाच छान वाटतं म्हणून हा प्रपंच.
फोकस जरा शिफ्ट झालाय सध्या . "एक पाय नाचिव रे गोविंदा" फेज आयुष्यात चालू आहे. पोटासाठीचे व्याप सांभाळत जे काही भटकणे झाले त्याने वर्षभर लढायची ऊर्जा दिली एवढे मात्र खरे. जाऊन आलेले किल्ले परत परत करताना सुद्धा मजा आली. भर उन्हात जावळीच्या जंगलातील अशक्य होत जाणारी पायपीट, कोस्टल कर्नाटकची रन टाइम ट्रिप, छोट्या मावळ्यांना घेऊन केलेली कोकण जलदुर्गांची सफर, रतनगडावरून अनुभवलेला पाऊस सोहोळा, एका नव्याने कळलेल्या ठिकाणी गेल्यावर डोळ्यासमोर ढग फुटून कोसळणाऱ्या पावसाचे अद्भुत आणि अविश्वसनीय दृश्य, बागलाणच्या दुर्गम दुर्गांची पुनश्च सफर, कृष्ण-रास नहाणं क्रीडेचे "याची डोळा" पाहिलेले विलोभनीय क्षण सर्व काही शब्दातीत.
तुम्ही फोटोंचा आनंद घ्या, व्हिडीओ ब्लॉग करायचा छोटासा प्रयत्न केलेला आहे तो आवडतोय का ते कळवा, कोणती माहिती हवी असल्यास बिनधास्त विचारा आणी अभिप्राय कळवत राहा. कोणीतरी आपण लिहिलेले वाचतय या विचारानेच लिहायचा उत्साह वाढतो.
तुम्ही फोटोंचा आनंद घ्या, व्हिडीओ ब्लॉग करायचा छोटासा प्रयत्न केलेला आहे तो आवडतोय का ते कळवा, कोणती माहिती हवी असल्यास बिनधास्त विचारा आणी अभिप्राय कळवत राहा. कोणीतरी आपण लिहिलेले वाचतय या विचारानेच लिहायचा उत्साह वाढतो.
जानेवारी : झोडगे शिवमंदिर, धुळे
जगदीश्वर मंदिर, देवळाणे , नाशिक
फेब्रुवारी : पुरंदर , लोहगड किल्ला , विसापूर किल्ला
मार्च : रसाळगड, खेड
एप्रिल : मुरुडेश्वर, गोकर्ण, कोस्टल कर्नाटक
मे : रेवदंडा किल्ला, कोर्लई किल्ला, दिवेआगर , हरिहरेश्वर
जुन : केंजळगड, रायरेश्वर, धोम, मेणवली
जुलै : मुठा , तुंग किल्ला
ऑगस्ट: रतनगड
सप्टेंबर : मेरुलिंग , बारा मोटेची विहिर
डिसेंबर: किल्ले वासोटा
वा, खरेच मस्त गेले हेही वर्ष. बरच काही अनुभव डोळ्यात आणि मनात. सगळेच क्षण लिहिता येतील असे नाही पण फोटोनी परत हवे तेव्हा जगता मात्र येतील म्हणून हा लेखनप्रपंच.
तर मग भटकत रहा . कोठे जाऊन काय बघायला मिळेल यु नेव्हर नो! हे संपन्न अनुभव कायम आठवणीत राहतील, पोटासाठीच्या लढाईमध्ये आयुष्यभर तजेला देतील, आणी असा काही आनंदाचा ठेवा देतील जो आपण आपल्या पुढच्या पिढीत देऊ शकू.
चला, सर्व वाचकांना मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो.
भेटत राहू …… वाचत राहा …
Youtube:
Instagram:
२ टिप्पण्या:
Khup sundar :)
Thanks Nitin :)
टिप्पणी पोस्ट करा