सोमवार, ७ जानेवारी, २०१९

२०१८! बॅक टू ट्रॅक




आठ तासांच्या विश्रांतीचे थांबे घेत धावता धावता अजून एक पूर्ण वर्ष संपले. अनुभवांच्या पाठपिशवीत बऱ्यापैकी भर पडली असं वाटतय. काही नवीन प्रसंग,आठवणी,काही लाईफ गोल्स व बरच काही. 
पूर्व भागात दिलेले मागच्या ४ वर्ष्यांचे लेख तुम्ही वाचले असतील तर मात्र सांगणे भाग आहे की या वर्षी ना बारीक झालो ना गोरा झालो. ( आधीच्या लेखातूनच हि लिंक लागेल. नाही लागली लिंक तरी काही फरक पडत नाही हो, चालुद्या !) 

तर, भटकायला सुरुवात केल्यापासून महिन्यात एकदातरी भटकायला निघायचे ठरवलेले आणी आज मागे वळून बघता बऱ्यापैकी साध्य झालंय. जेथे वर्षभरात जाऊन आलो त्याची फोटोरूपी झलक खास ब्लॉग वाचकांसाठी देतो आहे. नियमित वाचक असाल तर तुमच्या लक्षात आलेच असेल की, मोठाले डिटेल भटकंती वृत्तांत लिहायचा उत्साह आता केव्हाच मावळून गेलाय. ललित लेख वैगरे तर आता सुचणे आणी खरडणे दोन्ही कष्टप्रद झाल्यात. आधी "जीवन" असा  म्हंटले की प्रतिभेला कसा मोहोर यायचा तर आता "जीवन" म्हंटल्यावर "कोणत्या फॉन्ट मध्ये खरडू साहेब?" अशी गटण्यासारखी स्थिती आहे सो आता फोटोब्लॉगनी तरी ही धग तेवत ठेवावी म्हणून हा प्रपंच. 

असो, सध्या फोकस जरा शिफ्ट झालाय. "एक पाय नाचिव रे गोविंदा" फेज आयुष्यात चालू आहे सो त्या आनंदात ह्या साहित्यिक भोग जरा बाजूला पडले एवढच. या वर्षी पुन्हा नवीन जोमाने लिहायचे ठरवलंय, बघू किती जमतंय. तुम्ही फोटोंचा आनंद घ्या, कोणती माहिती हवी असल्यास बिनधास्त विचारा आणी अभिप्राय कळवत राहा. कोणीतरी आपण लिहिलेले वाचतय या विचारानेच लिहायचा उत्साह वाढतो. 


जानेवारी : ठाणाळे लेणी, तैलबैला



यावर मागच्या वर्षी खरडलेला एकमेव लेख :

फेब्रुवारी : तोरणा किल्ला, वेल्हे 



मार्च : नळदुर्ग किल्ला, उस्मानाबाद




एप्रिल : कर्दे, दापोली 



मे : कुलाबा किल्ला - अलिबाग , पेण 


जुन : पाऊस सोहळा ( निळकंठेश्वर, वरसगाव )


जुलै : पाऊस सोहळा ( शिवनेरी , नाणेघाट)


 

ऑगस्ट: कुंडलिका व्हॅली , ताम्हिणी 

 

सप्टेंबर : सातमाळा सप्तदूर्ग ( कण्हेरगड, धोडप , अहिवंत किल्ला )

 धोडप 

कण्हेरगड

अहिवंत


ऑक्टोबर : राजगड, रामदरा-पुणे 
रामदरा :
पाबे घाट : राजगड
राजगड :

नोव्हेंबर : निजामशाहीत भटकंती (हैद्राबाद ) 

गोवळकोंडा किल्ला :

रामोजी फिल्म सिटी :
चारमिनार :

डिसेंबर: खानदेशी मुशाफिरी ( अंकाई - टंकाई , गाळणा , चौल्हेर )

  अंकाई - टंकाई :

किल्ले गाळणा :

चौल्हेर :

 

वा, खरेच मस्त गेले हेही वर्ष. बरच काही अनुभव डोळ्यात आणि मनात. सगळेच क्षण लिहिता येतील असे नाही पण फोटोनी परत हवे तेव्हा जगता मात्र येतील म्हणून हा लेखनप्रपंच. 

तर मग भटकत रहा . कोठे जाऊन काय बघायला मिळेल यु नेव्हर नो!

चला, आता पाने घेतो आणि सर्व वाचकांना परत मनापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो.


भेटत राहू …… वाचत राहा …

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

पाऊस सोहळा : २

 पाऊस सोहळा : २

पहिला भाग येथे वाचता येईल.  :  पाऊस सोहळा : १

लांबच लांब पसरलेले हिरवेगार गालिचे. त्यावर नैसर्गिक मुक्त उधळण. ढगातले पाण्याचे थेंब अंगा-अंगावर थबकून अगदी पापण्यांवरही जमा झालेले दवबिंदू. गर्द जंगल आणी दाट धुके यामुळे झालेला मस्त माहोल,  मोकळ्या आकाशाखालची मुक्त भटकंती. मावळतीला ढगांनी गर्दी करून व्यापलेला आसमंत. तांबडफुटीला ढगात डोके खुपसून बसलेल्या डोंगररांगा, सूर्यदेवाने 'निघतो आता' म्हणत आवरता घेतलेला पसारा, संधीप्रकाशाचा खेळ, मातीचा गंध, वाऱ्याच्या ओढीने वहावत जाणारे कापसासारखे ढग, ओल्याचिंब चिकणमातीत ताठ मानेने उभी भाताची रोपे, असंख्य जलधारा. सगळे काही पाहतच राहावे असे.

या सोहोळ्याचे आपण साक्षीदार आहोंत हेच काय ते भाग्य. निसर्गाची किमया टिपण्याचे काही प्रयत्न. वाचत रहा.


साल्हेर किल्ल्यावरून दिसलेले इंद्रवज्र.:
सकाळची वेळ, महाराष्टातील सर्वात उंच, अजस्त्र पण हिरवागार साल्हेर किल्ला, कुठे पृथ्वी संपते आणि स्वर्ग चालू होतो याची चाहूलही लागू न देणारे उंच डोंगर आणि त्यावर उतरलेले ढग, पावसाळी वातावरण, हिरवा ब्लेझर घालून सजलेली सृष्टी, पूर्ण किल्ल्यावर फक्त दोनच भटके, पूर्णतः धुके, कोवळी सूर्यकिरणे, हलका पाऊस,  डोळे आणि मन भरून पाहावे असे दृश्य, इतिहासाची साक्ष देत उभे साल्हेरचे सहा बुलंदी दरवाजे, थोडेसे धुके बाजूला काय होते आणि कोवळ्या सुर्यकिरणांनी अशी काही जादू दाखवावी की डोळे आणि कॅमेरे स्तब्ध होऊन जावेत. 'काय होते आहे' हे समजण्याआधीच त्याचे लुप्त होणे आणि क्षणात परत अवतरणे. निरव शांतता भंग करत आम्हा दोघांचे एकच शब्द. "इंद्रवज्र सुपर्ब". उंच अश्या कड्यावरून खाली दरीत दिसणारे सप्तरंगी सुदर्शन चक्रच जणू. आणी त्या सुदर्शनात पडलेली माझीच सावली. अहाहा ! हा निसर्ग सोहळा अनुभवायचे भाग्य आज लाभले.




अंजनेरी किल्ला : हा फुलाचा फोटो पाहून 'अवतार' पिक्चर आठवला. 'Self Illuminating Trees' सदृश्य काहीतरी वाटत आहे.


अंजनेरी किल्ला : 


साल्हेर किल्ला :


सालोटा किल्ला:



नवरा -नवरी सुळके :


धोडप किल्ला :


पुरंदर किल्ला :



धोडप किल्ला : Way to Heaven. ( मुद्दाम साहेबाच्या भाषेत लिहिले, नाहीतर स्वर्गात जाणारा रस्ता म्हणजे गैरसमज नको !)


अहिवंत किल्ला :


कण्हेरगड :

मुळा गाव : 

कण्हेरवाडी :




 कण्हेरगड :


रामशेज किल्ला : 
 


साल्हेरवाडी गावातून : 
 



असो, सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलो यापलीकडे भाग्य ते कोणते?

 वाचत रहा. अभिप्राय कळवत रहा.